पार्श्वनाथ बँकेच्या नवीन ठेव आणी कर्ज योजनांचा लाभ घ्या-शंकर पाटील
कोल्हापूर ( प्रतिनिधी ): विश्वासार्तेसह शाश्वत बँकिंग सेवा देणारी आणी सभासदांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून कोल्हापूरातील पार्श्वनाथ बँकेची ओळख आहे. पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीस बँकेचे संचालक संजय देसाई यांनी सभासदांचे स्वागत केले, तर प्रोसिडिंगचे वाचन अमर निरुखे यांनी केलं. यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग पाटील यांनी सभेच्या नोटीसीचे वाचन केलं आणि बँकेच्या वार्षीक प्रगतीचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडत यापुढेही बँकेकडून तत्पर सेवेची ग्वाही दिली. तर बँकेचे अध्यक्ष विनोद मेहता यांनी सभासदांनी बँकेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सभासदांचे आभार मानले तर बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेन्टचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी सभासदांना बँक सुरुवातीपासूनच बँकेच्या अत्याधुनिक सेवा सुविधा पुरवीत आहे, बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे, बँक रिझर्व्ह बँक व सहकार खात्याच्या नियमानुसार कामकाज करून सभासदांच्या विश्वासात पात्र ठरली असल्याचे सांगत यावर्षी बँकेचा एनपीए शून्य टक्के असून सभासद खातेदार यांनी केलेल्या सहकार्याचे फलित असल्याचे सांगितले. तसेच बँकेने नवीन सुरू केलेल्या ठेवी व कर्ज योजनांचा लाभ घेऊन सभासदांनी आपली प्रगती साधावी असेही अवाहन शंकर पाटील यांनी केलं. तर शिवाजी पाटील, आय. ए. पाटील, माणिकराव पाटील- चुयेकर, रूपा शहा, किशोर जमादार यांनी सभेच्या कामकाजामध्ये भाग घेऊन बँकेच्या वाटचालीबाबत समाधान व्यक्त केलं.यावेळी बँकेचे संचालक मौक्तिक शंकर पाटील यांची क्रिडाईचे संचालकपदी तर संचालक संजय देसाई यांची कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणी शंकर पाटील यांचा कोल्हापूर बिल्डर्स असोसिएशनच्या उत्कृष्ट वास्तू निर्मिती पुरस्कार मिळाल्याबद्दल संचालक व सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती चंदनबेन शहा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सभेला बँकेचे सर्व संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार बँकेचे उपाध्यक्ष विक्रम शहा यांनी मानले.

Comments
Post a Comment