शिवराज पाटील यांच्या सामाजीक कार्यावर प्रकाशझोत...
कोल्हापूर ( प्रतिनिधी): सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले शिवराज पाटील यांना समाजाप्रती काहीतरी करण्याची पहिल्यापासूनच तळमळ होती. सुरवातीच्या काळात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केले. त्यातूनच जम बसवत त्यांनी वरदविनायक पार्कची स्थापना केली. बघता बघता वरद विनायक पार्क ह्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षांमध्ये रूपांतर झालं आणि एक नामवंत उद्योजक म्हणून ते कोल्हापुरात नावारुपास आले. सुर्वेनगर प्रभागात सामाजिक कार्याचा वसा हाती घेतलेल्या विजयकुमार धनाजी कांबळे या सामाजिक कार्यकर्त्याची समाजाप्रती धडपड पाहून आपण ही काही समाजाचे देण लागतो या उद्देशाने उद्योजक शिवराज पाटील यांनी विजयकुमार कांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचे ठरवले आणि यातुनच श्री शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रभागामध्ये अनेक विकास काम करण्यात आली.यामध्ये प्रभागातील भाजी मंडईची स्वच्छता, प्रभागामध्ये महिलांच्या हस्ते वृक्षारोपण,गणेश उत्सवामध्ये गणेश विसर्जनाची सोय, प्रभागामध्ये ड्रेनेजची साफसफाई करून घेणे, पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करणे, स्वखर्चातुन गटर्स, नळे टाकणे एवढेच न्हवेतर रस्त्यांची डागडुजी करणे तसेच काही ठिकाणी स्वखर्चातून रस्त्ये केले. त्याचबरोबर प्रभागातील ओपनपेसची स्वच्छता देखील फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली.तर महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आले. विविध क्षेञातील महिलांचा सन्मानही करण्यात आला. प्रभागात ई श्रम कार्ड कॅम्प घेऊन नागरिकांना सेवा देण्यात आली. प्रभागातील लहान मुलांना खेळाचे साहित्य वाटप करून क्रीडा क्षेत्रात देखील योगदान देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं. जी कामे प्रशासनाने किंवा महापालिकेने करायचे असतात ती कामे शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली.यामुळे या परिसरामध्ये विजयकुमार कांबळे यांच्या सोबतच शिवराज पाटील दादा हे प्रभागातील नागरीकांना आपल्याच घरातील सदस्य वाटू लागले. शिवराज पाटील दादा हे प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागले अशा या निस्वार्थपणे काम करणार्या व्यक्तीमत्वाचा म्हणजेच शिवराज पाटील दादा यांचा आज वाढदिवस आहे .या वाढदिवसानिमित्त शिवराजदादांना निरोगी आणी उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना आणी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा..

Comments
Post a Comment