पर्यावरण पुरक घरे बांधणे काळाची गरज- पालकमंञी प्रकाश आबिटकर


 कोल्हापूर( प्रतिनिधी): ग्लोबल वार्मिंग मुळे बदलत्या वातावरणात पर्यावरण पूरक घर बांधणी ही काळाची गरज असल्याचे मत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणी राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी व्यक्त केले. कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोल्हापूर आणि अल्ट्राटेक सिमेंट्स यांच्या वतीने आयोजित ,अभियंता दिन व उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र लोहार होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शितल शिंदखेडे, सागर छागाणी, प्राचार्य जयंत घेवडे यांच्या उपस्थितीत डॉक्टर एम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी बोलताना प्राचार्य जयंत घेवडे आणी शितलराज शिंदेखेडे यांनी पर्यावरण पूरक घरांसाठी आवश्यक सर्व माहीती उपस्थित मान्यवरांना दिली.  यावेळी उत्कृष्ट अभियंता पुरस्काराचे वितरण पालकमंञ्यांच्या हस्ते करण्यात आले. तर उत्कृष्ट अभियंता जीवनगौरव पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे स्थापत्य  विभागाचे माजी कुलसचिव गिरीश कुलकर्णी यांना  देऊन गौरविण्यात आले. तर समर्थ श्रावणी केअर सेंटरच्या  संपदा मुळेकर, कुस्तीमध्ये एशियन चॅम्पियनशिप मिळवणारी  ऋतुजा गुरव, तसेच सागर चांगणी,सौरवी मंडलिक, तनिष्का पाटोळे यांनाही सन्मानीत करण्यात आले. तर पत्रकार संरक्षण माहिती अधिकार पोलीस मित्र व ग्राहक संरक्षण ,या राज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन गोखले तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कांडेकरी  यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संजय मांगलेकर, संतोष मंडलिक,एम.जी. कुंभार, मोहन गोखले, विजय पाटील, चंद्रकांत कांडेकरी, सुजित भोसले, राजेंद्र लाड, अनिल भालेकर ,सुनील पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...